Sunday, December 08, 2013

सखी

        २०१२ मधे नवरात्रीच्या वेळेस मी भारतात होतो (वजा बायको). तिची जरा आठवण पण येत होती  आणि तेंव्हा  देवीची आरती चालू असताना, डोक्यात एक कल्पना आली.. ह्या आरत्या ज्या भाषेत असतात, साधारण त्या प्रकारात एखादी कविता केली तर..

भाळावरती चंद्रकोर,
नाकी मोतीयाची नथ।
गळा शोभे चपलाहार,
कानी लोंबती लोलक।
काय वर्णू शिणगार.. माझिया सखेचा।।          

काया जणू घाट वाट,
शालू जणू गर्द रान।
यौवनाचा येई गंध,
चोळी अंगी अशी तंग।
नांदी देती पैंजण.. माझिया सखेची।।

नैनी काजळ गडद,
वाणी सुरेल सप्तक।
चाल अशी जीवघेणी,
रुके काळीज थबक।
दिस सरेना शिवाय.. माझिया सखेच्या।।       

----आनंद----   

Friday, November 29, 2013

A business trip to India..

        खरं म्हणजे मी US ला आल्यापासून माझी दर वर्षी एक India trip होतेच. कारण कोणतेही असो personal किंवा business. पण ह्यावेळची(२०१२) trip जरा वेगळी होती.Kind of forced, business/personal. Due to some visa issues, I had to spend a month outside the country.So २ आठवडे Bangaloreला officeचं काम आणि २ आठवडे सुट्टी असा plan ठरला.माझ्या मनात एक दुसरा पण हेतु होता, मला हे बघायचं होतं की मी जरका Bangaloreला move झालो, तर आयुष्य कसं असेल.
        मी २०१० मधे जेंव्हा Bangaloreला गेलो होतो, तेंव्हा मला सगळं ठिक वाटलं होतं, त्यामुळे ह्या trip मधे जेंव्हा मी परत तिकडे चाललो होतो, तेंव्हा माझ्या मनात जरा जास्तच अपेक्षा होत्या. पण unfortunately, I was a little disappointed. भारतात, आधी मध्यम वर्ग सगळ्यात मोठा होता आणि आता, श्रीमंत फारच श्रीमंत आणि गरीब आणखी गरीब झालेत असं मला वाटलं. Of course, हे नेहमीच माहित होतं, लहानपणापासून हेच बघितलं पण होतं. पण ह्या Bangalore trip मधे हे प्रकर्षानं जाणवलं. मी ज्या hotelमधे रहात होतो, तिथे नुसते ७-८ कपडे धुतले तर bill २ हजार रुपये आलं.May be, तेवढ्या पैश्ायत मला २-३ साधे नवीन कपडे घेता आले असते. रोज सकाळी officeला जायला cab hotelवर यायची आणि गल्ली बोळातून officeला न्यायची. मी त्या पांढरा uniform असलेल्या driver वाल्या मोठया AC गाडी मधे मस्त paper वाचत असायचो आणि traffic lightला थांबलेले, दुचाकी वरचे लोकं माझ्याकडे कुतूहलनी म्हणा किंवा इर्षेनी म्हणा पहायचे. तेंव्हा मला हा असमतोल फारच जाणवला.
        माझं लहानपण साधेपणात गेलं. एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांचं असतं तसं. Car, hotelमधे जेवणे, ह्या तेंव्हा चैनीच्या गोष्टी वाटायच्या. त्यानंतर Engineeringसाठी घराच्या बाहेर पडलो आणि ४ वर्षं hostelमधे काढली. तेंव्हा घरून आलेल्या पैश्ायत महीना कसा काढायचा हे आपोआप शिकलो. आई-बाबांनी, बहिणीनी, तेंव्हा कधी काही कमी पडू दिलं नाही. Actually, बहिणीनी तिच्यापरीनं लाडचं केले पण आयुष्यात उधळपट्टी अशी कधीच केली नाही. Hostelच्या त्या ४ वर्षांनी adjustment म्हणजे काय हे शिकवलं. एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, तर त्याचं दुःख न करता, काय आहे, त्यात कसं समाधान मानायचं, हा विचार करायला शिकवलं. 
        आणि आता इतक्या दिवसांनी, business trip वर भारतात आल्यावर, सगळं चित्रच पलटलेलं. महागड hotel, एका माणसाच्या एका वेळच्या जेवणाला दीड-दोन हजार रुपये bill, कोणी नुसती bag उचलून ठेवली तर त्याला ५०-१०० रुपये tip, well, I understand inflation पण तरी हे सगळं गरजेपेक्षा जास्त महाग होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मला खूप वाइट वाटलं. Especially, जेवण झाल्यावर अन्न उरलं तर फारच. माझ्या एका दिवसाच्या foodच्या billवर एखादं छोटं गरीब कुटुंब १-२ आठवडे जेवू शकलं असतं. मी मागे जेंव्हा असच आलो होतो, तेंव्हा पण हेच सगळं असच खर्चिक होतं पण तेंव्हा मला त्यात काही गैर वाटलं नाही. उलट मला वाटलं होतं की वा, business trip म्हणजे काय मजा असते.काम प्रचंड, पण ही बाकीची फारच ऐश आहे. आता may be, मी थोडा मोठा झालोय, थोडा अजुन mature झालोय अणि त्यामुळे मला ह्या दुसर्या बाजूची पण जाणीव झालीये. I think that was the reason why I was a little disappointed, not with India but with myself. मला guilty वाटलं. मी जरका भारतात नेहमीसाठी परत आलो, तर माझ्यापरिनी मी ही परिस्थिती पालटायला नक्कीच प्रयत्न करेल आणि may be तेंव्हा मला ह्याबद्दल एवढं वाइट वाटणार नाही.माहित नाही..पण जोपर्यंत मी परत जात नाही तोपर्यंत किमान आर्थिक दृष्टया तरी मी माझ्या परीन होईल तेवढी मदत करायची ठरवलयं..

----आनंद----                                                                                     
माझा blog revive करण्याचा हा अजुन एक प्रयत्न…मी २००७ नंतर काही लिहिलच नाही असं नक्कीच नाही. Actually मी बरच काही लिहिलय. हळू हळू आता ते पोस्ट  करतो..
----आनंद----