Sunday, January 28, 2007





माझ्या लाडक्या कॅमेर्याची कमाल....
हे पाचही photos मी एकाच जागी उभे राहून काढले आहेत.. :) :)

Friday, January 19, 2007

खुप वर्षं लोटलीत त्याला..आलो होतो सोडून आपली माती..
बरं मग आताच का हे पाय मागे वळून पहाती..??

घेतील का ते मला त्यांच्यात परत?
आपलेच घर..आपलेच रस्ते..आपलेच लोक आणि आपलीच नाती?

बाबांना चहा लागत असला तरी..
फक्त माझ्यासाठी म्हणून करेल आताही आई कॉफी?

भेळेच्या नुसत्या एका वाद्यावर..
देतील करू मित्र आताही बॅटींगची पहिली बारी?

वडा-पाव खाल्ला तर..
टपरीवाला अण्णा देइल करू आताही उधारी?

रात्री घरी उशीरा परत आलो..
तरी कोणाला कळू न देता घेईल मला घरात ताई?

आजपण मी कशात पहिला आलो..
तर करतील तेवढंच कौतूक शाळेतल्या जोशी बाई?

मी चुकलॊ..वाईट वागलो..
तर आताही असेल बाबांच्या कपाळावर ती आढी?

असणार..ती आढी अजुनही तशीच असणार..
असणार..जोशी बाईंचा मी अजुनही तितकाच लाडका असणार..
असणार..ताई माझ्यासाठी अजुनही जागीच असणार..
असणार..माझं खातं अणाच्या डायरीमधे अजुनही नक्कीच असणार..
असणार..मित्रं बॅटींगसाठी माझी अजुनही वाट बघंत असणार..
असणार..माझी आई आजपण हातात कॉफीचा मग घेउन तिथेच उभी असणार..

मला माहितीये..हे सगळे आजपण तिथेच असणार..तसेच असणार..
नक्की असणार!!

----आनंद----