Saturday, October 14, 2006

जीवन गाणे..गात रहावे , जीवन गाणे...

परवा संध्याकाळी ५ वाजता आमच्या university hospital बाहेर , बसची वाट पहात बसलो होतो. माझी बस ५.४० ला होती त्यामुळे साधारण ३०-४० मिनीटं तिथेच थंडीत बसुन होतो. मी बसलो होतो, त्याच्या समोरच valet parking booth होतं,patientsसाठी केलेली खास सोय..त्यांना parking lot पर्यंत स्वत: जाण्याचे कष्ट पडू नयेत म्हणुन. तिकडे गाडया पार्क करायला जाणार्यांची आणि परत येणार्यांची धावपळ सुरु होती. पाच वाजल्याची वेळ असल्यामुळे, Health Science Center(HSC) मधली offices पण सुटली होती. बर्याच लोकांची parking lot कडे जायला गडबड चालली होती. सोबत वाचायला काही पुस्तक पण नव्ह्तं. Actually, होतं..पण ते अभ्यासाचं होतं पण अश्या फ़ावल्या वेळात अभ्यास करणे म्हणजे माझ्या द्रुष्टीनी एक अजामिनपात्र गुन्हा आहे. अश्या वेळेचा सदुपयोग हा अभ्यसाव्यतिरीक्त चांगली पुस्तकं वाचायलाच करायला हवा.. ह्या मताचा मी आहे. तर मुद्दा हा की.. दुसरं करायला काही नव्ह्तं म्हणुन मी iPodवर आवडीच्या गाण्यांची एक playlist बनवली आणि गाणे ऐकत..आजु-बाजुच्या लोकांना न्याहाळत तिथेच टाइम पास करत बसलो.

हॉस्पिटलच्या गेट मधुन एक अमेरीकन बाई आणि तिचा नवरा एकदम खुश होऊन बाहेर पडताना दिसले. त्यांच्या मागुन दोन आज्जी-आजोबा पण येत होते. आजोबांच्या हातात एक छोट्ट्ट्सं बाळ होतं आणि आज्जीच्या हातात होते फ़ुगे आणि greeting cards. सगळ्यांच्या चेहर्यावरुन आनंद नुसता ओसंडुन वहात होता आणि का नाही?? त्यांच्या छोटू बाळाला ते पहिल्यांदा घरी घेऊन चालले होते ना? :) :)

नंतर एक दुसरी खुप जाड अमेरीकन बाई आली. तिच्या एका डोळ्याचं operation झालं होतं I guess.. आणि तिला discharge मिळाला होता.. पण तिला घरी घेऊन जायला कुणीच आलेलं नव्हतं...cab बोलवली होती तिनी. तिच्या चेहर्यावर एक प्रकारचा वेगळाच थकवा दिसत होत. तो आजारीपणाचा होता की तिचा कोणीच family member तिला घ्यायला आला नाही ह्याचा होता.. काय माहीत? किती फ़रक होता ह्या दोन्ही द्रुश्यात..आधीचं ते गोड चौकोनी कुटुंब ,ज्याला नुकताच पाचवा कोन आला होता आणि आत्ताच हा एकटाच बिंदु...एकटाच....

त्यानंतर एक खुपच smart आणि young मुलगी माझ्या समोरुन जोरात गेली.....wheelchairवर... बहुदा ती HSC मधल्या कोणत्या तरी officeमधे काम करत असावी कारण तिच्याकडे एक office bag होती आणि चेहर्यावरुन तरी ती patient वाटत नव्हती. तिला घ्यायला बहुदा तिचा नवरा आला होता. तो पण खुप छान , प्रसन्न,हसणारा वाटला मला. दोघं एकमेकांना बघुन इतकं गोड्ड्ड हसली.. काय सांगु तुम्हला.. मग त्यानी समोरचं दार उघडलं, तिनी स्वत:ला कसं बसं समोरच्या seatवर कोंबलं आणि मग त्यानी मागचं दार उघडुन तिची wheelchair आत घेतली. मग दोघांनी एक पट्कन kiss घेतला एकमेकांचा आणि निघुन गेले तिथुन... :) :) मी बघतच राहीलो..माझं डोकंच सुन्न हौऊन गेलं होतं..काय म्हणावं मी त्या जोडप्याला.. त्या मुलीच्या अपंगत्वावर वाइट वाटून घ्यावं, तिच्या कर्तुत्वाकडे बघुन तिला सलाम ठोकावा की त्या दोघांचं प्रेम बघुन आश्चर्यानी थक्क व्हावं.. काहीच कळालं नाही मला..
आणि तेंव्हा माझ्या iPodवर गाणं चालु होतं "जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुशकील आ जाये,तुम देना साथ मेरा ओ हम नवाब...जब हो चांदनी रात, हर कोई है देता साथ,पर तुम अंधेरोमेंभी ना छोडना मेरा हाथ...."

ती गेल्यावर दोनच मिनीटात मला अजुन एक धक्का बसल.. एक ३५-४०शीतलं जोडपं.. I guess तो माणुस patient होत.. तो काही HSC मधल्या offices मधला वाटत नव्हता..पण पुन्हा तेच.. तो पण wheelchair वर होता आणि त्याला घ्यायला एक बाई आली होती.. बहुदा त्याची बायकोच असवी.... दोघांनी जेव्हा एकमेकांना बघितलं, तेव्हा कोणाच्याच चेहर्यावरची एक रेषा पण हालली नाही.. तो माणुस तिथल्या helperच्या मदतीनी गाडीत बसला आणि ते दोघं जणं निघुन गेले... आयुष्याचे , नात्यांचे किती वेग-वेगळे पैलू मला त्या तिथे परवा बघायला मिळत होते... जीवन जगणं म्हंटलं तर किती अवघड आहे आणि म्हंटलं तर किती सोपं पण... हे त्या दोन couplesकडे बघुन मला कळालं.

त्यानंतर मला दिसले दोन म्हतारा-म्हातारी. त्या आजोबांना नीट चालता येत नव्ह्तं. I mean, ते दोघं पण खुपच म्हातारे होते. आजोबा त्या आज्जीन्च्या हाताला पकडुनच चालत होते. त्या आज्जी valet parkingच्या booth पाशी आल्या आणि तिथल्या माणसाकडे बघुन इतक्या गोड्ड्ड हसल्या म्हणुन सांगु.. बहुदा तो माणुस त्यांना ओळखत असवा कारण त्यानी काही न बोलताच, तो त्यांची गाडी आणायला गेला..त्या आज्जी इतक्या छान होत्या ना, खुपच प्रेमळ होता त्यांचा चेहरा...I could visualize की त्यांच्या तरुणपणी, मझ्यासारखे किती पोरं त्यांच्यावर लाइन मारत असतील ते.. :) :) आजोबा was a luckyyy man... :)

तेवढ्यात माझी बस आली आणि तेंव्हा iPod वर गाणं लागलं होतं.."जीवन गाणे..गात रहावे , जीवन गाणे..."

----आनंद----