Saturday, October 14, 2006

जीवन गाणे..गात रहावे , जीवन गाणे...

परवा संध्याकाळी ५ वाजता आमच्या university hospital बाहेर , बसची वाट पहात बसलो होतो. माझी बस ५.४० ला होती त्यामुळे साधारण ३०-४० मिनीटं तिथेच थंडीत बसुन होतो. मी बसलो होतो, त्याच्या समोरच valet parking booth होतं,patientsसाठी केलेली खास सोय..त्यांना parking lot पर्यंत स्वत: जाण्याचे कष्ट पडू नयेत म्हणुन. तिकडे गाडया पार्क करायला जाणार्यांची आणि परत येणार्यांची धावपळ सुरु होती. पाच वाजल्याची वेळ असल्यामुळे, Health Science Center(HSC) मधली offices पण सुटली होती. बर्याच लोकांची parking lot कडे जायला गडबड चालली होती. सोबत वाचायला काही पुस्तक पण नव्ह्तं. Actually, होतं..पण ते अभ्यासाचं होतं पण अश्या फ़ावल्या वेळात अभ्यास करणे म्हणजे माझ्या द्रुष्टीनी एक अजामिनपात्र गुन्हा आहे. अश्या वेळेचा सदुपयोग हा अभ्यसाव्यतिरीक्त चांगली पुस्तकं वाचायलाच करायला हवा.. ह्या मताचा मी आहे. तर मुद्दा हा की.. दुसरं करायला काही नव्ह्तं म्हणुन मी iPodवर आवडीच्या गाण्यांची एक playlist बनवली आणि गाणे ऐकत..आजु-बाजुच्या लोकांना न्याहाळत तिथेच टाइम पास करत बसलो.

हॉस्पिटलच्या गेट मधुन एक अमेरीकन बाई आणि तिचा नवरा एकदम खुश होऊन बाहेर पडताना दिसले. त्यांच्या मागुन दोन आज्जी-आजोबा पण येत होते. आजोबांच्या हातात एक छोट्ट्ट्सं बाळ होतं आणि आज्जीच्या हातात होते फ़ुगे आणि greeting cards. सगळ्यांच्या चेहर्यावरुन आनंद नुसता ओसंडुन वहात होता आणि का नाही?? त्यांच्या छोटू बाळाला ते पहिल्यांदा घरी घेऊन चालले होते ना? :) :)

नंतर एक दुसरी खुप जाड अमेरीकन बाई आली. तिच्या एका डोळ्याचं operation झालं होतं I guess.. आणि तिला discharge मिळाला होता.. पण तिला घरी घेऊन जायला कुणीच आलेलं नव्हतं...cab बोलवली होती तिनी. तिच्या चेहर्यावर एक प्रकारचा वेगळाच थकवा दिसत होत. तो आजारीपणाचा होता की तिचा कोणीच family member तिला घ्यायला आला नाही ह्याचा होता.. काय माहीत? किती फ़रक होता ह्या दोन्ही द्रुश्यात..आधीचं ते गोड चौकोनी कुटुंब ,ज्याला नुकताच पाचवा कोन आला होता आणि आत्ताच हा एकटाच बिंदु...एकटाच....

त्यानंतर एक खुपच smart आणि young मुलगी माझ्या समोरुन जोरात गेली.....wheelchairवर... बहुदा ती HSC मधल्या कोणत्या तरी officeमधे काम करत असावी कारण तिच्याकडे एक office bag होती आणि चेहर्यावरुन तरी ती patient वाटत नव्हती. तिला घ्यायला बहुदा तिचा नवरा आला होता. तो पण खुप छान , प्रसन्न,हसणारा वाटला मला. दोघं एकमेकांना बघुन इतकं गोड्ड्ड हसली.. काय सांगु तुम्हला.. मग त्यानी समोरचं दार उघडलं, तिनी स्वत:ला कसं बसं समोरच्या seatवर कोंबलं आणि मग त्यानी मागचं दार उघडुन तिची wheelchair आत घेतली. मग दोघांनी एक पट्कन kiss घेतला एकमेकांचा आणि निघुन गेले तिथुन... :) :) मी बघतच राहीलो..माझं डोकंच सुन्न हौऊन गेलं होतं..काय म्हणावं मी त्या जोडप्याला.. त्या मुलीच्या अपंगत्वावर वाइट वाटून घ्यावं, तिच्या कर्तुत्वाकडे बघुन तिला सलाम ठोकावा की त्या दोघांचं प्रेम बघुन आश्चर्यानी थक्क व्हावं.. काहीच कळालं नाही मला..
आणि तेंव्हा माझ्या iPodवर गाणं चालु होतं "जब कोई बात बिगड जाये, जब कोई मुशकील आ जाये,तुम देना साथ मेरा ओ हम नवाब...जब हो चांदनी रात, हर कोई है देता साथ,पर तुम अंधेरोमेंभी ना छोडना मेरा हाथ...."

ती गेल्यावर दोनच मिनीटात मला अजुन एक धक्का बसल.. एक ३५-४०शीतलं जोडपं.. I guess तो माणुस patient होत.. तो काही HSC मधल्या offices मधला वाटत नव्हता..पण पुन्हा तेच.. तो पण wheelchair वर होता आणि त्याला घ्यायला एक बाई आली होती.. बहुदा त्याची बायकोच असवी.... दोघांनी जेव्हा एकमेकांना बघितलं, तेव्हा कोणाच्याच चेहर्यावरची एक रेषा पण हालली नाही.. तो माणुस तिथल्या helperच्या मदतीनी गाडीत बसला आणि ते दोघं जणं निघुन गेले... आयुष्याचे , नात्यांचे किती वेग-वेगळे पैलू मला त्या तिथे परवा बघायला मिळत होते... जीवन जगणं म्हंटलं तर किती अवघड आहे आणि म्हंटलं तर किती सोपं पण... हे त्या दोन couplesकडे बघुन मला कळालं.

त्यानंतर मला दिसले दोन म्हतारा-म्हातारी. त्या आजोबांना नीट चालता येत नव्ह्तं. I mean, ते दोघं पण खुपच म्हातारे होते. आजोबा त्या आज्जीन्च्या हाताला पकडुनच चालत होते. त्या आज्जी valet parkingच्या booth पाशी आल्या आणि तिथल्या माणसाकडे बघुन इतक्या गोड्ड्ड हसल्या म्हणुन सांगु.. बहुदा तो माणुस त्यांना ओळखत असवा कारण त्यानी काही न बोलताच, तो त्यांची गाडी आणायला गेला..त्या आज्जी इतक्या छान होत्या ना, खुपच प्रेमळ होता त्यांचा चेहरा...I could visualize की त्यांच्या तरुणपणी, मझ्यासारखे किती पोरं त्यांच्यावर लाइन मारत असतील ते.. :) :) आजोबा was a luckyyy man... :)

तेवढ्यात माझी बस आली आणि तेंव्हा iPod वर गाणं लागलं होतं.."जीवन गाणे..गात रहावे , जीवन गाणे..."

----आनंद----

Tuesday, September 26, 2006

का असतो रंग....

का रंग हिरवा असतो झाडांचा,टवटवीचा आणि मनाचा..?
का रंग निळा असतो आकाशाचा,पाण्याचा आणि डोळ्यांचा?
का रंग काळा असतो रात्रीचा,पडद्याचा आणि दुखां:चा?
का रंग सोनेरी असतो किरणांचा,सुखांचा आणि स्वप्नांचा?

----आनंद----

Tuesday, August 29, 2006

Asa Kahi Rule Ahe Ka??

Parikshet napas zalo,radavas vatat asla tar tevahi..
Teacherni tar changlach zaplela astana,aai-babani pan kanakhali kadhaylach havi ka?
Asa kahi rule ahe ka??

Mood far chan asla,nachavas vatat asla tar tevahi..
Ekhadya porikade baghun shitti marli, tar tina sandel dakhvyalach havi ka?
Asa kahi rule ahe ka??

Resultchi faar utsukta asli,apekshancha gathoda dokyavar asla tar tevahi..
Mandiratlya ranget ubha rahun ushir zalela astana,mark-sheet ghayla rang marutichya sheptievdi lambach havi ka?
Asa kahi rule ahe ka??


Itar weli apan sher banun firto pan 'pyaar ka izahaar' karaychi wel yete nemka teva..
Ghashyatun adhich ek shabdahi futat nastana,tila mobilevar tichya babancha phone yaylach hava ka?
Asa kahi rule ahe ka??

Mahatwacha interview asla,khup tension alela asala tar tevahi..
Alarm clock ni daga dilyavar tyach divshi,trainscha pan strike asaylach have ka?
Asa kahi rule ahe ka??

Pravas karat astana,samorchya seatvarchi porgi sahi chikni vatate tar tevahi..
Tina nemka aplyakade laksha na deta,aplya shejarchyala bhav dyalach hava ka?
Asa kahi rule ahe ka??

Khup khup important jobchi status meeting aste tar tevahi..
Ratrichi thodi utarleli tar nastech pan mag baykoni pan tevach sagle kapde istrila takaylach havet ka?
Asa kahi rule ahe ka??
Mala sanga, asa rule kuni kutha lihun thvla ahe ka????

Friday, July 14, 2006

कधी कधी आपली खुप इच्छा असते , छान काही तरी बोलायची....
पण शब्द साथ देत नाहीत..
कधी कधी आपली खुप इच्छा असते , कोणाला तरी चांगलच झापायची....
पण तरीही शब्द साथ देत नाहीत..
मग नेहेमी अशा नालायक शब्दांवर विसंबुन रहाण्यात काय अर्थ आहे?
बोलु देत ना कधीतरी.. डोळ्यांनाच डोळ्यांशी....

----आनंद----

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

तिच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती..
दोघंही होतो आनंदात..

तिच्या आयुष्यात गुंतलेली ती, माझ्या आयुष्यात गुंतलेलो मी..
ह्याही गोष्टीचा विसर पडलेला की..
तिचं-माझं नसुन, हे आमचं आयुष्य होतं कधी तरी..

चुक कोणाचीच नव्हती पण बरोबर पण कोणीच नव्ह्तं..
जीवनाच्या जमा खर्चात, शिल्लक काहीच उरलं नव्ह्तं..

कोणी आधी सुरुवात केली आणि कोणी केल शेवट..
स्वप्नातल्या घराच्या वाटेवरुन नक्की कोण गेलं भरकटत?

एकाच रस्ता चुकला तरी, दुसरा त्याला शोधत जाई..
त्या दिवसांची आठवण, डोळ्यात टचकन पाणी घेउन येई..

पण आता सगळं संपलं होतं, कुणाचंच दुसर्यावाचुन काहीच अडलं नव्हतं..
एकमेकांना विसरण हे कधी इतकही सोपं कसं होऊ शकतं?
हा प्रश्न पडला मला...

असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....

----आनंद----

Saturday, April 01, 2006

असं का होतं??

आपल्याला जेंव्हा एखाद्या व्यक्तीची खुप काळजी वाटत असते आणि आपण तिची खुप काळजी घेत पण असतो तेंव्हा... आपल्याला तिच्याबद्दल कसं वाटतंय हे पण त्या व्यक्तीला माहिती असतं पण तरीही हळु हळु असं व्हायला लागतं की ती समोरची व्यक्ती आपल्याला "taken for granted" घ्यायला लागते..ह्या गोष्टीचा तिला विसर पडतो की आपण जे काही चांगलं वागत आहोत ते केवळ तिच्याबद्दलच्या आपल्याला असलेल्या प्रेमामुळे,काळजीमुळे. आपला चांगुलपणा हा केवळ आपलं सौजन्य असतं,आपली कमजोरी नाही. पण नेमकी हिच गोष्टं नजरेआड केली जाते...आपल्या चांगुलपणाची तिला कदर वाटेनाशी होते..."हा काय बाबा, मी कशी जरी वागले/वागलो,तरी माझ्याशी चांगलाच वागणार आहे", असा एक मनोग्रह होतो.
आणि समोरचा माणुस बिचारा, "ही काय सांगण्याची गोष्ट थोडीच आहे,तिचं तिलाच हे कळायला हवं", असा विचार करतो आणि गप्प बसतो.
ही गोष्टं आपल्याला नेहेमीचं अनुभवायला मिळते...कधी आपण काळजी करणारी व्यक्ती असतो तर कधी जिची काळजी घेतल्या जात आहे, ती व्यक्ती असतो..
पण प्रश्न असा आहे की, हे असं का होतं????

--आनंद--

Sunday, March 12, 2006

सध्या माझ्या universityतल्या professorsनी मला प्रेमच काय ;) , पण अभ्यास सोडून बाकीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला अजिबात वेळ मिळणार नाही ह्याची पुर्ण खबरदारी घेतलीये ....
त्यामुळे आता थोडे दिवस "No blogging"....

--आनंद--

Wednesday, March 01, 2006

प्रेमाच्या काही शब्दांआधीची शांतता आणि त्या शब्दांनंतरची शांतता
ह्यात जमीन-अस्मान इतका फ़रक असतो....

॥ इति श्री आनंद महाराज ॥ :):)

Wednesday, February 15, 2006

तुझे डोळे

तुला काल रडताना बघुन,
मला त्या पाण्याची खरंच किव आली..
मला त्याला विचारावंस वाटलं,"का रे बाबा,
तुला त्या डोळ्यांमधुन बाहेर पडावंस वाटलंच तरी कसं"??

----आनंद----

विश्वास....

विश्वास ही फार विचित्र गोष्ट आहे..
'तुझा माझ्यावर जितका, तितकाच, माझाही तुझ्यावर आहे'
असं म्हणताना, दोघांचीही पापणी लवली नाही...
म्हणजे त्यातच सगळं आलं..

----आनंद----

Tuesday, January 31, 2006

अरे बापरे!! माझ्या मागच्या पोस्टवर सगळ्यांच्या खुप वेगवेगळ्या प्रतिक्रीया येतील, हे मला expected होतंच पण माझ्या मित्रांच्या इतक्या strong reactions येतील, असं मात्र मला खरंच वाटलं नव्हतं. लोकांनी माझं शेवटच्या ओळीतलं Disclaimer वाचलेलं दिसत नाहीये.. :)
Public, look at it as just another article of mine..not as a page from my diary or something. :):)

--Anand--

मला तिला बघायचंय ......

डोळे मिटले की, तिच समोर येते... कधी खळखळुन हसणारी, कधी माझ्याकडे बघुन गोड, लाडीकपणे हसणारी, कधी रडका चेहरा करुन आणि गाल फ़ुगवुन माझ्यावर रुसुन बसलेली, कधी रडवेली झालेली, तर कधी सगळ्या जगाचं ओझं तिच्याच खांद्यावर आहे अश्या अविर्भावात विचारमग्न झालेली... मी स्वत:ला इतका खुश पहिल्यांदाच बघतोय. खरंच प्रेम किती सुखद भावना आहे नाही?

मला तिला बघायचंय दिवसभर, रात्रभर.
मला बघायचंय ती सकाळी उठते, तेव्हा पहिली गोष्ट काय करते, आळस कसा देते, डोळे कसे चोळते, दात कसे घासते,तिच्या टूथ ब्रशचा रंग कोणता, तिला मिंटवाली टूथपेस्ट आवडते का स्ट्राइप्सवाली? ती कोणता साबण वापरते? तिच्या टॉवेलचा रंग कोणता? तिला कोणत्या रंगाचे कपडे आवडतात? तिला कोणत्या प्रकरचे कपडे आवडतात? तिला साडी नेसता येते का? पॅन्ट घालत असताना , ती डाव्या पायात आधी घालते की उजव्या पायात? टिशर्ट काढत असताना विस्कटलेले तिचे केस आणि त्यामुळे वैतागलेली ती, मला मनाच्या एका कोपर्यात हळुवारपणे जपुन ठेवायचे आहेत. तिला हिल्सवाली सॅन्डल आवडते का फ़्लॅट सोल असलेली चप्पल? ती कशात छान दिसते? आंघोळ झाल्यावर ती देवाला नमस्कार करते का? करत असेल तर मला देवासमोर ध्यान लावुन बसलेलं तिच ते रूप डोळे भरुन पहायचय. तिच्या आवडीचा देव कोणता ? कोणत्या देवाला ती मानते? देवाधर्मावर तिचा विश्वास नसेल, तर का नाही - हे मला तिला विचारायचंय.

तिला काय खायला आवडतं? गुलाबजाम घेताना ती वाटीत एका वेळी किती घेते? रसमलाइ घेताना ती रस जास्त घेते का मलाइ ? ठेचा खातना तिच्या डोळ्यातुन पाणी येतं का ? आणि येत असेल तर एकाच डोळ्यातुन येतं का दोन्ही डोळ्यातुन येतं, हे मला बघायचंय. मला तिच्या आवडीचे पदार्थ बनवुन ती थकलेली,वैतागलेली असताना तिला सरप्राइज द्यायचंय. मी कपडे बेडरूम मधे इकडे तिकडे पसरवुन टाकले की तिची होणारी चिड चिड ,तिचं लाल होणारं ते नाक... मला सगळं सगळं बघायचंय. लाइट गेले की ती घाबरते का? तिल लहान मुलं आवडतात का? आम्हाला पहिला मुलगा झालेला तिला आवडेल की मुलगी..हे मला तिला विचारायचंय.

तिला उगवणारा सुर्य आवडतो की मावळणारा? तिला कोणता खेळ बघायला/खेळायला आवडतो? पत्ते खेळत असताना मी मुद्दाम तिच्याशी हरतोय, हे तिच्या लक्षात येतय का, ते मला बघायचय. आई-बाबा त्याच रूम मधे असताना आणि त्यांचं लक्ष नसताना, मी तिचा हात पकडल्यावर तिचे गुलाबी होणारे गाल आणि लाजुन खाली गेलेली नजर मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवायचिये. मी रात्री घरी उशीरा आल्यावर , मझी वाट पहाता पहाता सोफ़्यावरच झोपलेली ती नाजुक बाहुली मला अलगद उचलुन नीट पलंगावर ठेवायचिये आणि तिच्या अंगावर पांघरुण घालायचंय. कधी तिला घरी यायला उशीर झाला, तर मी केलेला तिच्या आवडीचा स्वयंपाक बघुन संसारसुखाने सुखावलेली ती मला बघायचिये.

तिचा स्वभाव जाणुन घ्यायचाय अगदी तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार तिनी स्वत: मला सांगण्या आधी माझ्या ओठातुन तो बाहेर येइल इतकं छान मला तिला कळुन घ्यायचंय. तिच्याशी भांडायचंय, नंतर वेडे वेडे चाळे करुन तिचा राग पळवायचाय आणि कधी तिच्याकडुन माझी स्वत:ची पण समजुत काढुन घ्यायचिये. मला आलेलं एखादं अपयश, तिच्या मिठीत विरघळुन मला विसरायचंय आणि आम्हाला मिळणार्या यशाचा प्रत्येक क्षण अन क्षण कायम लक्षात राहील, असा साजरा करायचाय.

तिला अगदी भरभरुन, माझ्याच्यानी होइल तितकं मला प्रेम द्यायचंय. तिनी वटपौर्णिमेला स्वत:हुन देवाकडे 'जन्मो जन्मी हाच पती मिळु दे' ही दरवर्षी मनापासुन प्रार्थना करावी असं मला बनायचंय..इतकं मला तिला आनंदात ठेवायचंय........

(This is a work of pure fiction and any resemblance to a person living/dead is purely coincidental ;) )
----आनंद कुलकर्णी

Wednesday, January 18, 2006

मला तुला आज काही तरी छान द्यायचं होतं,
पण मी तुला काय देणार? तुला तर देवानी आधीच सगळं दिलंय.
खुप विचार केला...खुप खुप विचार केला...
आणि मग ठरवलं....
आपल्याला कितीही महाग पडली तरी,
हिच्या सगळ्यात आवडीची गोष्टच देउयात....
हिला हसवुयात.....खुश ठेवुयात....