Saturday, April 01, 2006

असं का होतं??

आपल्याला जेंव्हा एखाद्या व्यक्तीची खुप काळजी वाटत असते आणि आपण तिची खुप काळजी घेत पण असतो तेंव्हा... आपल्याला तिच्याबद्दल कसं वाटतंय हे पण त्या व्यक्तीला माहिती असतं पण तरीही हळु हळु असं व्हायला लागतं की ती समोरची व्यक्ती आपल्याला "taken for granted" घ्यायला लागते..ह्या गोष्टीचा तिला विसर पडतो की आपण जे काही चांगलं वागत आहोत ते केवळ तिच्याबद्दलच्या आपल्याला असलेल्या प्रेमामुळे,काळजीमुळे. आपला चांगुलपणा हा केवळ आपलं सौजन्य असतं,आपली कमजोरी नाही. पण नेमकी हिच गोष्टं नजरेआड केली जाते...आपल्या चांगुलपणाची तिला कदर वाटेनाशी होते..."हा काय बाबा, मी कशी जरी वागले/वागलो,तरी माझ्याशी चांगलाच वागणार आहे", असा एक मनोग्रह होतो.
आणि समोरचा माणुस बिचारा, "ही काय सांगण्याची गोष्ट थोडीच आहे,तिचं तिलाच हे कळायला हवं", असा विचार करतो आणि गप्प बसतो.
ही गोष्टं आपल्याला नेहेमीचं अनुभवायला मिळते...कधी आपण काळजी करणारी व्यक्ती असतो तर कधी जिची काळजी घेतल्या जात आहे, ती व्यक्ती असतो..
पण प्रश्न असा आहे की, हे असं का होतं????

--आनंद--