Thursday, December 27, 2007

आयुष्य कसं जगावं? ह्याबद्दल फ़ंडे देणारे लेख, कथा, काव्य, महाकाव्य इतकंच नाही तर खंड-काव्य सुद्धा तुम्हाला सापडेल. वानगी म्हणुन इकडून-तिकडून उचललेले हे काही फ़ुकटचे फ़ंडे घ्या.... :)

  • आयुष्याचा प्रत्येक दिवस, आजचा दिवस शेवटचा, असा जगला पाहिजे.
  • आयुष्याचा प्रत्येक दिवस, आजचा दिवस पहिला, असा जगला पाहिजे.
  • आयुष्य हा एक निष्काम कर्मयोग आहे, तेंव्हा ते फ़ळाची अपेक्षा न करता, जे समोर येईल त्याला तोंड देत जगलं पाहिजे.
  • आयुष्य फार छोटं आहे त्यामुळे फक्त स्वत:साठी जगा.
  • दुसर्यासाठी जगतो, तोच खरा जगतो.
  • त्याची जळतीये तर जळू देत ना दाढी, मी पेटवून तर घेतो तिच्यावर माझी बिडी.

----आनंद----

Tuesday, June 12, 2007

पेटव सारं रान..

दोन मिनीटं थांब, जरा दोन मिनीटं थांब.
मागे वळून बघ जरा..पळतोयेस का लांब?
अरे असलं संकट तर काय झालं..?
डोळ्यात डोळे घाल, त्याच्या डोळयात डोळे घाल.
आहेस ना खरा मर्द? मग रडतोयेस का असा..?
अरे कर त्याला गारद त्याची पिळून टाक मान.
कसली भिती? कसलं दडपण?
सगळा तुझ्या मनचा खेळ..
अरे ठोक छाती, ठोक मांडी..
दे त्याला धोबीपछाड..पेटव सारं रान..

----आनंद----

Sunday, January 28, 2007





माझ्या लाडक्या कॅमेर्याची कमाल....
हे पाचही photos मी एकाच जागी उभे राहून काढले आहेत.. :) :)

Friday, January 19, 2007

खुप वर्षं लोटलीत त्याला..आलो होतो सोडून आपली माती..
बरं मग आताच का हे पाय मागे वळून पहाती..??

घेतील का ते मला त्यांच्यात परत?
आपलेच घर..आपलेच रस्ते..आपलेच लोक आणि आपलीच नाती?

बाबांना चहा लागत असला तरी..
फक्त माझ्यासाठी म्हणून करेल आताही आई कॉफी?

भेळेच्या नुसत्या एका वाद्यावर..
देतील करू मित्र आताही बॅटींगची पहिली बारी?

वडा-पाव खाल्ला तर..
टपरीवाला अण्णा देइल करू आताही उधारी?

रात्री घरी उशीरा परत आलो..
तरी कोणाला कळू न देता घेईल मला घरात ताई?

आजपण मी कशात पहिला आलो..
तर करतील तेवढंच कौतूक शाळेतल्या जोशी बाई?

मी चुकलॊ..वाईट वागलो..
तर आताही असेल बाबांच्या कपाळावर ती आढी?

असणार..ती आढी अजुनही तशीच असणार..
असणार..जोशी बाईंचा मी अजुनही तितकाच लाडका असणार..
असणार..ताई माझ्यासाठी अजुनही जागीच असणार..
असणार..माझं खातं अणाच्या डायरीमधे अजुनही नक्कीच असणार..
असणार..मित्रं बॅटींगसाठी माझी अजुनही वाट बघंत असणार..
असणार..माझी आई आजपण हातात कॉफीचा मग घेउन तिथेच उभी असणार..

मला माहितीये..हे सगळे आजपण तिथेच असणार..तसेच असणार..
नक्की असणार!!

----आनंद----