असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....
तिच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय ती..
दोघंही होतो आनंदात..
तिच्या आयुष्यात गुंतलेली ती, माझ्या आयुष्यात गुंतलेलो मी..
ह्याही गोष्टीचा विसर पडलेला की..
तिचं-माझं नसुन, हे आमचं आयुष्य होतं कधी तरी..
चुक कोणाचीच नव्हती पण बरोबर पण कोणीच नव्ह्तं..
जीवनाच्या जमा खर्चात, शिल्लक काहीच उरलं नव्ह्तं..
कोणी आधी सुरुवात केली आणि कोणी केल शेवट..
स्वप्नातल्या घराच्या वाटेवरुन नक्की कोण गेलं भरकटत?
एकाच रस्ता चुकला तरी, दुसरा त्याला शोधत जाई..
त्या दिवसांची आठवण, डोळ्यात टचकन पाणी घेउन येई..
पण आता सगळं संपलं होतं, कुणाचंच दुसर्यावाचुन काहीच अडलं नव्हतं..
एकमेकांना विसरण हे कधी इतकही सोपं कसं होऊ शकतं?
हा प्रश्न पडला मला...
असंच एकदा पहाटे पहाटे, स्वप्न पडलं मला....
----आनंद----
4 comments:
" ये जिवन है। ईस जिवनका यही है, यही है रंग रुप ।"
विसरत कोणीच नसत, काळाच्या ओघात फक्त अधुंक होत जात. कारण व्यवहाराला जिवनात स्थान
देण्या शिवाय गत्यंतर नसत.
Anand you are too good!!! fakta regularly lihi yar..
Mann you are too great! kay lihile aahes re apratim...
kadachit he swapanech jaganyachya navin aasha asataat
Post a Comment