Sunday, December 08, 2013

सखी

        २०१२ मधे नवरात्रीच्या वेळेस मी भारतात होतो (वजा बायको). तिची जरा आठवण पण येत होती  आणि तेंव्हा  देवीची आरती चालू असताना, डोक्यात एक कल्पना आली.. ह्या आरत्या ज्या भाषेत असतात, साधारण त्या प्रकारात एखादी कविता केली तर..

भाळावरती चंद्रकोर,
नाकी मोतीयाची नथ।
गळा शोभे चपलाहार,
कानी लोंबती लोलक।
काय वर्णू शिणगार.. माझिया सखेचा।।          

काया जणू घाट वाट,
शालू जणू गर्द रान।
यौवनाचा येई गंध,
चोळी अंगी अशी तंग।
नांदी देती पैंजण.. माझिया सखेची।।

नैनी काजळ गडद,
वाणी सुरेल सप्तक।
चाल अशी जीवघेणी,
रुके काळीज थबक।
दिस सरेना शिवाय.. माझिया सखेच्या।।       

----आनंद----   

1 comment:

Exploring myself said...

Khoop sundar!! :)