Tuesday, April 22, 2014

उगीच बळंच…

असंच एकदा सहज बसलो,
म्हंटल बघावं काहितरी लिहून….

वही उघडली, पेन उचलला,
पण शब्दच फुटेना मनातून….

बसलो बघत एक टक पानाकडे कोऱ्या,
ते ही सारखं म्हणत होतं मला काहितरी हिणवून….

कोण मी पासून ते माझ्यानंतर काय?
सगळे सगळे विचार झाले डोक्यात घोळवून….

सुचले ते आवडेना, आवडेल असे सुचेना,
शेवटी बसलो डोक्याला हात लावून….

तितक्यात उगवली नापीक डोक्यातून एक सुपीक कल्पना,
आणि केली ही कविता उगीच बळंच यमक जुळवून….      

----आनंद कुलकर्णी----
       

No comments: