Saturday, April 26, 2014

चार ओळी

आज नविन सुरुवात आहे..
पुन्हा पहिला शब्द आणि परत पहिलं पाऊल आहे….
प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचा हा पुन्हा एक प्रयत्न..
नवा दिवस, नवे ध्येय आणि नविन दिशा आहे….

----आनंद कुलकर्णी----       

दोन ओळी

 मी तुला पहाताना, तू मला पहावंस….
मग पाहून न पाहिल्यासारखं करावं, तू ही आणि मी ही!

----आनंद कुलकर्णी----

Tuesday, April 22, 2014

सुतळी बॉम्ब.. एक item song..

Disclaimer:
काही लोकांना हे गाणं अश्लील वाटेल आणि माझ्या सभ्य imageला तडाही जाईल :) पण तरीही धाडस करून पेश करतो एक नवीन काव्यरचना..  


मी हाय सुतळी बॉम्ब साहेब, असल ठिणगी तर द्या मला पेटवून…. 

होतील असे आवाज अन काढल असा धूर की, बसेल दणका अन रहाल खिळून
मी हाय सुतळी बॉम्ब साहेब, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….

वाटोळी टंच माझी ही काया, आतून भरलिया ज्वानीची आग,
भल्या भल्यांच्या उरात धडकी घालते माझी छोटीशी वात
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….

हिरवी कंच माझी ही सुतळी, बसला ओढत तर सरल ही रात
असं काय करता, लांब का सरता, लावला नाही का आधी कधी बार
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….

झाला लई उशीर, आता मीच दावते वात, द्या मला पेटवून काडी विझायच्या आत
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….

----आनंद कुलकर्णी---- 

उगीच बळंच…

असंच एकदा सहज बसलो,
म्हंटल बघावं काहितरी लिहून….

वही उघडली, पेन उचलला,
पण शब्दच फुटेना मनातून….

बसलो बघत एक टक पानाकडे कोऱ्या,
ते ही सारखं म्हणत होतं मला काहितरी हिणवून….

कोण मी पासून ते माझ्यानंतर काय?
सगळे सगळे विचार झाले डोक्यात घोळवून….

सुचले ते आवडेना, आवडेल असे सुचेना,
शेवटी बसलो डोक्याला हात लावून….

तितक्यात उगवली नापीक डोक्यातून एक सुपीक कल्पना,
आणि केली ही कविता उगीच बळंच यमक जुळवून….      

----आनंद कुलकर्णी----