Disclaimer:
काही लोकांना हे गाणं अश्लील वाटेल आणि माझ्या सभ्य imageला तडाही जाईल :) पण तरीही धाडस करून पेश करतो एक नवीन काव्यरचना..
मी हाय सुतळी बॉम्ब साहेब, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….
होतील असे आवाज अन काढल असा धूर की, बसेल दणका अन रहाल खिळून
मी हाय सुतळी बॉम्ब साहेब, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….
वाटोळी टंच माझी ही काया, आतून भरलिया ज्वानीची आग,
भल्या भल्यांच्या उरात धडकी घालते माझी छोटीशी वात
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….
हिरवी कंच माझी ही सुतळी, बसला ओढत तर सरल ही रात
असं काय करता, लांब का सरता, लावला नाही का आधी कधी बार
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….
झाला लई उशीर, आता मीच दावते वात, द्या मला पेटवून काडी विझायच्या आत
बसेल दणका अन रहाल खिळून, असल ठिणगी तर द्या मला पेटवून….
----आनंद कुलकर्णी----